धुळे : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 17 मेंढ्या ठार

बिबट्या www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बिबट्याच्या हल्ल्यात 17 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे घडली आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेतली असून या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

धुळे तालुक्यातील मेहरगाव शिवारात दिलीप लक्ष्मण भामरे या शेतकऱ्याने क्रांती ऍग्रो फार्म च्या माध्यमातून 100 शेळ्यांचा कळप त्यांच्या शेतात ठेवला आहे. रात्री उशिरा या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला. ही बाब दिलीप भामरे यांच्या निदर्शनास आली. या घटनेत 17 शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे बाब निदर्शनास आली. बिबट्याने तीन शेळ्या खाऊन फस्त केल्या. तर उर्वरित शेळ्यांचा गळा आणि पोटावर बिबट्याने गंभीर वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान या घटनेमुळे धुळे तालुक्यातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धुळे तसेच साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ असून माळरानावर मेंढ्यांचे कळप ठेवले जातात. या भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी आहेत .त्यामुळे वन विभागाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी होते आहे.

हेही वाचा:

The post धुळे : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 17 मेंढ्या ठार appeared first on पुढारी.