धुळे : विश्‍वनाथ-सुकवड ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या विजया पाटील बिनविरोध

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विश्‍वनाथ सुकवड ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. लोकनियुक्त सरपंचपदी विजया गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर तीन ग्राम पंचायत सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धुळे तालुक्यासह जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यात माघारीअंती विश्‍वनाथ सुकवड ग्रामपंचातीत लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर तीन सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी विजया गुलाबराव पाटील यांची तर सदस्य म्हणून सुवर्णा पंकज पाटील, लताबाई दगा पाटील, कमल यशवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी विश्‍वनाथ सुकवड ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. तर पुन्हा एकदा ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच तसेच सदस्यांचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा:

The post धुळे : विश्‍वनाथ-सुकवड ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या विजया पाटील बिनविरोध appeared first on पुढारी.