धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या आझादनगर परिसरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्याच आठवड्यात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता औषध विक्रीच्या केंद्रावरच छापा टाकण्यात आला. याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसमोर मुख्य म्होरक्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

धुळे शहरात खोकला बरा होण्यासाठी वापरली जाणारे औषधांची तस्करी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील मोठा साठा जप्त करण्याच्या घटना घडल्या असून संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात आझाद नगर परिसरात राहणाऱ्या तिघा तरुणांकडून मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. मात्र सोमवार (दि.27) पुन्हा आझाद नगर परिसरात ८० फुटी रोड करून निळा चौक भागाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या काटेरी झुडपात औषधाचा साठा ठेवला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने या ठिकाणी छापा मारला. यावेळी मौलवीगंज भागात राहणाऱ्या फैजान अहमद मुजमील अन्सारी या युवकाने त्याच्या कापडी पिशवीत ठेवलेल्या गुंगीकारक औषधाच्या चाळीस बाटल्या आढळून आल्या. ही पिशवी त्याने काटेरी झुडपालगत लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रिसक्रिप्शन शिवाय स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध कायदेशीर मार्गाने चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रंगेहाथ मिळून आला. म्हणुन सदर इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी औषध विक्रीचे केंद्र उघड आल्याने आता पोलिसांसमोर गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या मुख्य म्होरक्याला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा:

The post धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान appeared first on पुढारी.