धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय 

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय संपादन केला. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत आ. अमरीशभाई पटेल हे स्वतः नेतेमंडळी यांच्याबरोबर कामानिमित्त मुंबई येथे होते. ते स्वतः या निवडणुकीत शिरपूरमध्ये नसताना देखील त्यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून शिरपूर तालुक्यातील जनतेने त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला एकतर्फी विजय मिळवून दिला.

तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. सर्व विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष करत जनक विला निवासस्थान आमदार कार्यालयात विजय व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सर्व पदाधिकारी, शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्वसाधारण मतदार संघ

गुजराथी किरण बद्रीनाथ 672, जमादार शांतीलाल इंद्रसिंग 657, पाटील अरविंददास आनंदा 662, पाटील कांतीलाल दगा 624,
पाटील चंदू धोंडू 653, महाजन विठोबा सिताराम 559,

महिला राखीव मतदार संघ

पाटील मेघा राजेंद्र 689, मराठे मनीषा राजकपूर 691

इतर मागासवर्ग मतदार संघ

पाटील प्रसाद मोहन 762

अनुसूचित जमाती मतदार संघ

पावरा कृष्णा गेंदराम 730

सर्वसाधारण मतदार संघ

पाटील लक्ष्मीकांत बापुराव 793 , राऊळ आनंदसिंग दर्यावसिंग 719

अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ

पावरा जगन सुपा 769

आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ

बोरसे मिलींद दौलतराव 777

व्यापारी व अडते मतदार संघ

अग्रवाल अर्पित घनशाम 76

हमाल व तोलारी मतदार संघ

कढरे किरण जतन 162

हेही वाचा :

The post धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय  appeared first on पुढारी.