धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

धुळे शिवसेना www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (दि.9) शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शने करीत रोष व्यक्त केला. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या समोर ठेवून मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

धुळे शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाला असून उन्हाळ्याच्या तोंडावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (दि.9) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिका प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे संकुलापासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत रॅली काढून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत मनपा प्रशासनाचा निषेध केला आहे. यावेळी शिवसेनेचे नंदुरबार संशिवसेनेचे नंदुरबार संपर्कप्रमुख तथा माजी आ. प्रा. शरद पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील ङाॅ.सुशील महाजन, हेमाताई हेमाङे, ङाॅ.जयश्री वानखेङे, देवा लोणारी, ललित माळी भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, विनोद जगताप, महादू गवळी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनप्रसंगी प्रतिक्रिया देताना माजी आमदार शरद पाटील यांनी मनपा सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. धुळे महानगरसाठी पुरेसा पाणीसाठा असून देखील महानगरपालिका प्रशासन जनतेला नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन करीत असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.

हेही वाचा:

The post धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने appeared first on पुढारी.