नंदुरबार: गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार राज्यात द्वितीय

सीसीटीएनएस प्रणाली www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

राज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची ओळख आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून असतांना देखील ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा ‘अर्थातच (CCTNS) प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 मध्ये झाली असून CCTNS प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणाऱ्या प्रत्येक घडामोडींची ऑनलाईन नोंदी घेण्यात येते. त्यात प्रथम माहिती अहवाल (FIR), स्टेशन डायरी नोंदी, अटक आरोपींच्या नोंदी, तसेच पोलीस ठाण्यातील हस्तलिखीत होणाऱ्या सर्व नोंदी या आता CCTNS प्रणालीत संगणकाद्वारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संबंधीत कर्मचाऱ्यांकडुन CCTNS प्रणालीत दैनंदिन डाटा फिडींगचे काम करुन घेत असून त्यावर प्रत्यक्ष पर्यवेक्षण नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचेकडून होते. गुन्हेगारांवरील वचक ते सामाजिक बांधीलकी जपण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 11 पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र शासनाचा सुरु असलेला CCTNS प्रणाली राबविण्यात जिल्ह्याने 232 पैकी 222 गुण प्राप्त करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात इंटरनेटचा स्पीड, सुरळीत नसणारा वीज पुरवठा व इतर अत्याधुनिक सुविधा नसतांना देखील CCTNS प्रणाली राबविण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र पोलीस दलात एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात CCTNS चे मुख्य शहर असून त्याठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांचे पथक असून पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन ऑनलाईन फिडींगच्या कामावर ते देखरेख ठेवतात. तसेच पोलीस ठाण्याला येणारे तांत्रिक व इतर अडचणीबाबत ते पोलीस ठाण्याव्दारे सोडविले जाते. जिल्ह्यातील धडगांव, मोलगी, अक्कलकुवा व इतर ग्रामीण भागात इंटरनेटच्या मर्यादा इतर पोलीस ठाण्यांपेक्षा कमी आहे. त्यातच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अशा अनेक अडचणीवर मात करुन पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची दिलेल्या विहीत वेळेत व जास्तीत जास्त ऑनलाईन फिडींग करुन नंदुरबार जिल्हा CCTNS समुहाने जुलै- 2022 मध्ये संपूर्ण राज्यात द्वितीय स्थान पटकावल्याने पोलीस अधीक्षक पाटील यांनी सर्व समुहाचे अभिनंदन करुन त्यांना रोख बक्षीस देखील जाहीर केले आहे.

यांच्या यशस्वी कामगिरीमुळे लाभले बक्षीस:

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी,  सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारचे पोलीस निर्माक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, पोलीस नाईका राजेंद्र मोरे व नंदुरबार जिल्ह्यातील CCTNS चे काम पाहणारे पोलीस अमलदार यांचे पथकाने केलेली आहे.

हेही वाचा:

The post नंदुरबार: गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार राज्यात द्वितीय appeared first on पुढारी.