नाशिकमध्ये १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तीन जणांना अटक

गुटखा www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर परिसरातील वडाळा गावात पोलिसांनी छापा टाकत सुमारे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या मोठ्या कारवाईची संपूर्ण वडाळा परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहान अन्वर शेख (28), शोएब इकबाल पटेल (33), मोहम्मद गुफराण कुतुबुद्दीन खान (22) आणि  असद जाकीर सय्यद (सर्व रा.वडाळागाव) यांनी १७ लाख १५ हजार ६२५ रुपये किमतीचा जयका १०००० या कंपनीचे गुटखाचे प्रत्येकी ७५ पुड्यांचे पाकिटे असलेल्या १५२५ किलोग्राम वजनाच्या १०८ गोण्या बाळगल्या. सेंट सादिक शाळा परिसरातील सालार रो हाऊसेसच्या मागील परिसरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. संशयीत जाकीर सय्यद याने नमूद वर्णनाचा व किमतीचा गुटख्याचा माल महाराष्ट्रात बंदी असताना चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रोहान शेख याच्या मदतीने साठवून ठेवला होता. मात्र पोलिसांनी गोपनीय खबर मिळताच कारवाईच्या भीतीने त्याने मुद्देमाल उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि.4) रात्री आठच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. तर वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

The post नाशिकमध्ये १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तीन जणांना अटक appeared first on पुढारी.