Amol Mitkari : बाबा- बुवांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे राजकारण

Amol Mitkari

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशात बाबा-बुवा व महाराजांचे पेव फुटले आहे. बाबा- बुवांकडून माणसा-माणसांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. धर्म व जातीच्या नावाखाली जनतेला भडकवून सामाजिक तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे. याला त्वरित आवर घालणे गरजेचे असल्याचे मत व्याख्याते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

त्रिशरण यंग फ्रेंड कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक विकास संस्था व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीकडून सिडकोतील पवननगर स्टेडियम येथे आयोजित जाहीर व्याख्यानात मिटकरी बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, माजी नगरसेविका शीतल भामरे, माजी नगरसेविका शीला भागवत, त्रिशरण संस्थेचे अध्यक्ष विनोद भडांगे, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, महिला अध्यक्षा शोभा केदारे, कल्पना नेरकर, नियोजन समितीचे प्रमुख संतोष सोनपसारे, दीपक मोकळ, सुनील जगताप, डॉ. अनिल आठवले, स्वागताध्यक्ष संदीप वानखेडे, बाळासाहेब गिते, विजय पाटील आदी उपस्थित होते.

व्याख्याते मिटकरी यांनी सिडकोवासीयांना आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास संजय भामरे, बाळासाहेब गिते, देवचंद केदारे, हेमंत गायकवाड, अंकुश वराडे, मिलिंद जगताप, गौतम पराडे, अमोल नाईक, मिलिंद कळवणकर, विशाल डोके, प्रीतम भागवत, राजन साळवे, शिवनाथ अहिरे, संदीप अहिरे, मदन जमधडे, तुषार भागवत, पवन मटाले, प्रफुल्ल वाघ, योगेश निसाळ, अक्षय परदेशी, संदीप वाघ, अजय साळवे, गणेश तुपसुंदर, राजेश भोसले, शशी गरुड, तुळशीराम भागवत, एम. डी. प्रताप, हिरामण साळवे, हेमंत नेहेते, अमित खांडे, सुनील घुगे, सुनील मोरे, विजय पाटील, किरण गाडे आदींसह परिसरातील सामाजिक, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Amol Mitkari : बाबा- बुवांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे राजकारण appeared first on पुढारी.