नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या (मुख्य उर्ध्ववाहिनी) 600 मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने, त्याच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड भागातील काही प्रभागातील पाणीपुरवठा बुधवारी (दि. २१) बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १७ मधील कॅनाॅलरोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर, भीमनगर परिसर. प्रभाग क्रमांक १८ मधील शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचकगाव, सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग क्रमांक१९ मधील गोरेवाडी, शास्त्रीनगर. प्रभाग क्रमांक २० पुनारोड परिसर, रामनगर, विजयनगर, शाहूनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातानगर भागातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी या प्रभागातील सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, तर सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.