नाशिकरोडला रेल्वे डब्यातच सुरु झालय हॉटेल, अशी आहे खासियत

रेल्वेडब्यात हॉटेल,www.pudhari.news

उमेश देशमुख

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याजवळ एका रेल्वे डब्यातच सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले हॉटेल सुरू करण्यात आले आहे. नव्याने सुरू झालेल्या हॉटेलला ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेतर्फे देशातील विविध  रेल्वे स्थानकावर ग्राहकांच्या सुविधांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना व सुख सुविधा निर्माण केल्या जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.  काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पॉड हॉटेलचे उद्घाटन केले होते. कमी खर्चात झोपण्यासाठी छोटा बेड अन् चहा, कॉफ़ीची व्यवस्था आहे. आता चक्क रेल्वे डब्यातच हॉटेल सुरू झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

रेल्वे डब्यातच हॉटेल
रेल्वे डब्यातच हॉटेल

अशी आहे खासियत…
रेल्वे डब्यात हॉटेल ही नवीन संकल्पना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर राबविली आहे. महाराष्ट्रात काही मोजक्या स्थानकावर अशी व्यवस्था आहे. यामध्ये साधारणपणे हॉटेलमध्ये असणारे सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. दक्षिण भारत व केरळ मधील सेफ खाद्य पदार्थ बनवतात. जेवणा व्यतिरिक्त पाणीपुरी, उतप्पा, मसाला डोसा हे पदार्थही मिळतात. आकर्षक सजावट आणि स्वच्छता हे भोगीतील रेल्वे डब्यातील हॉटेलचे खास वैशिष्ट्ये आहे. मद्रास बेकरी हे हॉटेल चालविते.

हेही वाचा :

The post नाशिकरोडला रेल्वे डब्यातच सुरु झालय हॉटेल, अशी आहे खासियत appeared first on पुढारी.