नाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

नांदगाव www.pudhari.news
नांदगाव: पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णात्वास आली असून, या विकास कामांचा लोकार्पण सोहळा कळमदरी येथे पार पडला. जन सुविधा योजना २०२०-२१ अंतर्गत येथील  ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील सभामंडप, स्मशानभूमी वॉल कंपाऊंड ,गाव अंतर्गत स्ट्रीट लाईट, व दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे लोकार्पण आमदार सुहास कांदे यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यानंतर ग्रामविकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यामध्ये आदिवासी वस्तीवरील सभामंडप बांधणे, स्मशानभूमी अंतर्गत बैठक व्यवस्था शेडची निर्मिती करणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पेवर ब्लॉक बसवणे व सोलार सिस्टीम बसवणे या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि.3) उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणेश चौधरी, बांधकाम विभागाचे उप अभियंता पाटील, माजी सभापती विलास आहेर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, सभापती सुभाष कुटे, शेखर पगार, प्रमोद भाबड किरण देवरे, दिलीप पगार, प्रमोद चव्हाण, मनोज पगार (सरपंच कळमदरी) उपसरपंच अंजनाबाई पगार, डॉक्टर विशाल पगार, सुरेश पगार रमेश पगार, नितीन पगार, दिलीप पगार, सुनील सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, शेखर शेवाळे, शशिकांत पगार आदिंसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.