नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील वीर सावरकर उड्डाणपुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे .नाशिक महापालिकेचे अधिकारी याला जबाबदार आहे. याप्रश्नी त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे आजच्या घडीला उत्तर महाराष्ट्रातला पहिला उड्डाणपूल म्हणून गौरविला गेलेल्या पुलाची वाट लागली असून याला महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांनी शुक्रवारी (दि.16) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलावर पडलेले खड्डे, पुलावरील तुटलेले कथडे आणि रस्त्याची झालेली दुर्दशेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांसोबत सवांद साधत ते म्हणाले की, पत्रकार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुलाची निर्मिती करण्यात आली. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2003 ला उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. सावरकर पूल नाशिक शहराचे नाक आहे. त्याचीच अवस्था आज बिकट झालेली दिसते.सतत होणारी वाहतूक कोंडी, रहदारी आणि कुंभमेळा या पार्श्वभूमीवर हा पूल तयार करण्यात आला. मात्र महापालिका प्रशासनाने या पुलाच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. याप्रश्नी महापालिका अधिकारी कुंभ कुंभकर्णाच्या झोपे सारखे सुस्तावलेले दिसतात. जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी ह्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेत नाही. तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. झोपलेले अधिकारी प्रशासन यांना जाग आणावीच लागेल , असे माजी महापौर दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रातला पहिल्या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेवरून माजी महापौरांचा मनपा प्रशासनावर हल्ला appeared first on पुढारी.