नाशिक : उर्दूप्रेमींनी घेतला शेकडो पुस्तकांचा लाभ

जुने नाशिक www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयूएलच्या फिरत्या ग्रंथालयास शहरात उत्तम प्रतिसाद लाभला.

बुधवारी (दि. 7) नॅशनल कॅम्पस येथे अनेक विद्यार्थी तसेच उर्दूप्रेमी नाशिककरांनी ग्रंथालयास भेट दिली. यावेळी विविध विषयांवरील शेकडो पुस्तकांची विक्री झाली. नॅशनल कॉलेजमधील युवतींनी ग्रंथालय पाहण्यासाठी गर्दी केली होती. फिरते ग्रंथालय शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू कॅम्पसमध्ये आल्यानंतर कॅम्पसचे सचिव प्रा. जाहीद शेख यांच्या हस्ते वाहनप्रमुख मोहम्मद ताहीर सिद्दीकी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत ग्रंथालयातील पुस्तक विक्रीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी उर्दू डिप्लोमाचे केंद्रप्रमुख लियाकत पठाण, राजू चंद्रात्रे उपस्थित होते. कौन्सिलचे संचालक डॉ. अकील अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन देशभर भ्रमण करून उर्दूप्रेमींना त्यांच्या पसंतीची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहे. या वाहनामध्ये उर्दू साहित्य, इतिहास, वनौषधी शास्त्र, डिक्शनरी, विज्ञान आदी विषयांवरील शेकडो पुस्तके पाहायला व खरेदी करायला उपलब्ध होती. पुस्तके खरेदीवर 20 ते 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली गेली. ग्रंथालयात भेट देणार्‍यांमध्ये प्रामुख्याने जेएमसीटी कॉलेज कॅम्पसचे हामीद शेख, अख्तरखान पठाण, मोबीन मनियार, बी. जी. गरड, नदीम शेख, तनवीर शेख, जमीर पठाण, नसरिन शेख, संजय साळवे, शाहेना शेख, सुधीर भालेराव आदींचा समावेश होता.

हेही वाचा:

The post नाशिक : उर्दूप्रेमींनी घेतला शेकडो पुस्तकांचा लाभ appeared first on पुढारी.