नाशिक : एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन निवड बिनविरोध

एम्प्लाईज असोसिएशन www.pudhari.news 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन कर्षण रेल्वे कारखाना नाशिकरोड, अतिरिक्त मंडळ कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया असोसिएशनच्या नाशिकरोड कार्यालयात नुकतीच खेळीमेळीत झाली. स्वाभिमानी पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी सुचित्रा गांगुर्डे यांची बहुमताने निवड झाली.

ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. या निवडणूक कार्यक्रमानुसार ८ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली होती. मात्र, निर्धारित मुदतीत स्वाभिमानी पॅनलच्या उमेदवारांनाच अर्ज दाखल केले. इतर कोणी उमेदवार अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी दर्शन तायडे यांनी स्वाभिमानी पॅनलच्या उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित केले. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अध्यक्षपदी सुचित्रा गांगुर्डे, तर सचिवपदी मिलिंद देहाडे यांची नियुक्ती झाली. कार्याध्यक्षपदी अविनाश कटारे, खजिनदारपदी समीर साळवे, अतिरिक्त सचिवपदी दीपाली पांडव यांची निवड झाली. यावेळी क. म. का. असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष हरीश जाधव, दीपक धीवर, नीलेश रोकडे, संदीप इंगळे, अनिल चोपडे, वाल्मीक बस्ते, अनिता दुनबळे, शीतल तिरपुडे, वैशाली केदारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : एससी-एसटी रेल्वे एम्प्लाॅइज असोसिएशन निवड बिनविरोध appeared first on पुढारी.