नाशिक: ओझर येथील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांचा छापा; मुद्देमाल जप्त आरोपी मात्र पसार

पोलीसांचा छापा www.pudhari.news

ओझर पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांच्या मांसा सह 7 लाख 68 हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल केला जप्त, 9 जणा विरूद्ध गुन्हा दाखल. मात्र सर्व जण पळून जाण्यात यशस्वी

नाशिक (ओझर) :  पुढारी वृत्तसेवा
येथील प्रार्थनास्थळा जवळील परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये ओझर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी असलेले 1500 किलो जनावरांचे मांस व 10 मोटारसायकलीसह इतर मुद्देमाल असा 7 लाख 67 हजार 700 रूपयांचा ऐवज जप्त करून 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच गोमांस बाळगणारे 9 जण सर्व मुद्देमाल जागेवरच सोडून पसार झाले.

शनिवारी (दि.1) पहाटे पावणे सहाच्या सुमारास ओझर मधील चांदनी चौकातील प्रार्थनास्थळा जवळील जाऊद्दीन कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करुन गोवंश मांस विक्रीसाठी कब्जात बाळगले असल्याची गोपनीय बातमी ओझर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरिक्षक अर्चना तोडमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता 8 गोवंशाची क्रुरपणे कत्तल करून त्यांचे मांस ,कातडी कत्तलीचे साहित्य व हाडे शिंगे आदि मिळून आले. पोलीसांनी विनापरवाना गोवंश जनावरांची कत्तल विक्री करण्यासाठी बाळगलेले 1500 किलो गोवंश जनावरांचे मांस,कातडी व कापण्यासाठीचे साहित्य तसेच वजन काटा, गुगल पे चे कुआर कोड व 10 मोटारसायकली असे एकुण 7 लाख 67 हजार सातशे रुपये किमतीचे साहित्य जप्त करून जुबेर लतीफ कुरेशी, ईजाज इसाक कुरेशी, ईस्तीयाक इसाक कुरेशी, अन्वर सुलतान कुरेशी, सलीम सुलतान कुरेशी, नदीम फारुख कुरेशी, अल्तमस सलीम कुरेशी,शाहरुख सलीम कुरेशी व जाऊद्दीन सुलतान कुरेशी (सर्व राहणार चांदणी चौक ओझर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बेकायदेशिररित्या 8 गोवंश जनावरांची कत्तल करुन गोवंश जनावरांचे मांस, कातडी विक्री करण्यासाठी कब्जात बाळगलेले आरोपींना पोलीसांचे आगमन झाल्याचा सुगावा लागताच आरोपींना मुद्देमाल जागेवरच सोडून पळ काढला. याप्रकरणी पोलीस निरिक्षक दुर्गश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अर्चना तोडमल हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक: ओझर येथील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांचा छापा; मुद्देमाल जप्त आरोपी मात्र पसार appeared first on पुढारी.