नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू

सिन्नर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे सोमवारी (दि.17) दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून वाळू नामदेव खेताडे यांच्या सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तर मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे समजते. भगवान खेताडे गाढवमळी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज कोसळल्याने सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्या चारण्यासाठी गेलेला भगवान याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत सहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने खेताडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

खोपडीत घरावर वीज कोसळली…
तालुक्यातील खोपडी खुर्द येथे सुरेश फकिरा दराडे यांच्या राहत्या घरावर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज कोसळली. त्यात दराडे यांच्या घराचे पत्रे फुटले. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.