नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित

घोटी पोलिस स्टेशन

इगतपुरी (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ गोवंश रक्षकांनी एका स्विफ्ट कार मधील दोन जनांना मारहाण केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास यांची नाशिक येथील पोलीस नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील सिन्नर घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून १५ ते २० गोवंश रक्षकांनी मिळुन मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या घोटी सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी जवळ शनिवार दि. २४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सिन्नरहुन मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारी स्विफ्ट कार MH02 BJ 6525 अडवुन कारमधील दोन व्यक्तींना दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून लोखडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाचा ठपका ठेवत कर्तव्यात कसूर केली म्हणुन घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस बिपीन जगताप, भास्कर शेळके, किसन कचरे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच घोटी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांचीही नाशिकच्या पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलीस निलंबित appeared first on पुढारी.