नाशिक : कासवगतीच्या कामामुळे धूळ, खड्ड्यांना सामोरे जातांना वाहनधारक, नागरिकांचे अतोनात हाल

पेठ महामार्ग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील महत्त्वाचा असणारा महामार्ग असलेल्या नाशिक-पेठ महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुुरू असल्याने सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. महामार्गावरील राऊ हॉटेलपासून ते नाशिक महापालिकेच्या हद्दीपर्यंतचा रस्ता याचा समावेश आहे. याकडे राज्य महामार्ग विभागाचे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पेठ नाक्यापासून सुरू झालेल्या या महामार्गाच्या सुरुवातीला असलेल्या फुलेनगर परिसरातील रहदारीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढे मळे परिसर, चामरलेणी परिसर या भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नोकरदार वर्ग तसेच सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी गेल्या 3 महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, काम कासवगतीने सुरू असल्याने या ठिकाणी कुठे धुळीचे साम्राज्य, तर कुठे काम करणार्‍या बांधकाम विभागाच्या गाड्या रस्ता थोपवून धरत असल्याची तक्रारही नागरिकांनी केलेली आहे. पेठ महामार्गालगतच्या रामशेज किल्ला, देहेरगड, राशेगाव तसेच महापालिका हद्दीजवळ महापालिकेच्या क्रिकेट स्टेडियममुळे भविष्यात शहराच्या विकासाला चालना देणारा हा रस्ता ठरणार आहे. असे जरी असले, तरी राज्य महामार्ग विभागाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

रस्तेकामास येणार्‍या गाड्यांमुळे जास्त जागा व्यापते. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धूळ आणि खड्डे यांचाही त्रास मोठ्या प्रमाणात होतो. राज्य महामार्गाचा दर्जा असला, तरी तो टिकवण्यासाठी कामाची गती वाढवणे आवश्यक आहे. – राहुल पगारे, नागरिक, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : कासवगतीच्या कामामुळे धूळ, खड्ड्यांना सामोरे जातांना वाहनधारक, नागरिकांचे अतोनात हाल appeared first on पुढारी.