नाशिक : कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात “वजन त्योहार उपक्रम”

लासलगाव www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव येथील कृषी नगर अंगणवाडी केंद्रात “वजन त्योहार उपक्रम”राबविण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने सुदृढ बालक होण्यासाठी व कुपोषणावर मात करण्याकरीता गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वजन त्योहार हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन उंची/लांबी तपासली गेली. बालकांच्या पोषणासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये पुन्हा एकदा वजन महोत्सव साजरा करण्यात येत असून यादरम्यान अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांना पूरक पोषण आहार वाटपासह पोषण आहाराची माहिती दिली जाणार असल्याची माहिती शिक्षिका अर्चना डुंबरे यांनी दिली. यावेळी आरोग्य विभागाच्या एल. एच. व्ही. ठाकरे सिस्टर, एम. पी. डब्ल्यू. कल्पेश महाजन, आशा गटप्रवर्तक रूपाली उगलमुगले, आशा सेविका संगिता पवार, सपना साताळकर, पालक प्रतिभा पाटील, प्रिया वाघ व अन्य पालक उपस्थित होते. उपक्रमासाठी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गागुर्डे, पर्यवेक्षिका अनिता काकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

The post नाशिक : कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात "वजन त्योहार उपक्रम" appeared first on पुढारी.