नाशिक : गणेश कुंवर यांची १९ तासांत पंढरपूर सायकलवारी

पंढरपूर सायकलवारी,www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

भगूरचे रहिवासी असलेले आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू गणेश कुंवर यांनी पुणे-पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर-पुणे अशा 451 किमीचा प्रवास अवघ्या १९ तासांत पंढरपूर सायकलवारी करत नागरिकांना आरोग्याबद्दल काळजी घेण्याचा संदेश दिला.

गणेश कुंवर यांचे पंढरपूर सायकलवारीचे हे चौथे वर्ष आहे. या अगोदर त्यांनी फ्रान्सच्या ऑडॅक्स क्लबतर्फे २००, ३००, ४००, ६००, १००० व १२०० किलोमीटरच्या सायकल राइड पूर्ण करून मानाचा असलेला सुपर रँडोनेरिंग हा किताब अकरा वेळेस पटकावलेला आहे. तसेच त्यांनी स्टँडम सायकल म्हणजे डबलसीट असलेली सायकल चालवून तीन वेळेस सुपर रँडोनेरिंगचा किताब पटकावलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सहकारी डॉ. अनिल कानडे होते.

गणेश कुंंवर हे हाफ आयर्नमॅनसुद्धा आहेत. सध्या गणेश कुंंवर हे पुणे येथे वास्तव्यास असून, महिंद्रा अँड महिंद्राच्या कान्हे येथील स्पेअर बिझनेस युनिटमध्ये कार्यरत आहे. या सायकलवारी दरम्यान त्यांना ऊन, जोरदार हवा व पाऊस अशा विषम परिस्थितीचा सामना करावा लागला. गणेश यांनी पंढरपूरची सायकलवारी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे, वृक्षमित्र तानाजी भोर, भगूर अर्बन सोसायटीचे चेअरमन शंकर करंजकर यांच्यासह मित्रपरिवार व नातेवाइकांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गणेश कुंवर यांची १९ तासांत पंढरपूर सायकलवारी appeared first on पुढारी.