नाशिक : गणेश गुसिंगेच्या मोबाइलमध्ये सापडल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका

गणेश गुसिंगे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी करताना पकडलेल्या संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाइलमध्ये वनविभागाच्या परीक्षेचे प्रश्न सापडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या वनविभागाची परीक्षा वादात सापडण्याची शक्यता आहे. तसेच गणेश गुसिंगेला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेतलेल्या परीक्षेत १३८ गुण मिळाल्याचेही समोर आले आहे.

नाशिकच्या तलाठी भरती परीक्षा सुरू असताना म्हसरूळ येथील परीक्षा केंद्रात हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित गणेश गुसिंगे यास अटक केल्यानंतर अनेक बाबी उघडकीस आल्या. पिंपरी चिंचवड येथील परीक्षेत इतर परीक्षांमध्येही त्याने घोळ केल्याचे समोर आले. त्यातच गणेश गुसिंगे हा एक परीक्षा पास झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे. यानंतर नाशिक पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न गुसिंगेच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. इतर परीक्षेतदेखील गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असून, गणेश हा पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. त्यामुळे नुकत्याच मेरिट लिस्ट जाहीर झालेल्या परीक्षेचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गणेश गुसिंगेच्या मोबाइलमध्ये सापडल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका appeared first on पुढारी.