नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू

अपघात www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात गतिरोधकावरून बुलेट घसरून पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब लक्ष्मण कळसकर (36) रा. निर्‍हाळे असे मृताचे नाव आहे. बाळासाहेब कळसकर व समाधान भाऊसाहेब शेलार (30, रा. शिंदे, ता. नाशिक) हे बुलेटने (एमएच 15, एचजे 6449) सिन्नरकडे येत होते. गोंदे शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील गतिरोधकावर त्यांची बुलेट घसरली. त्यामुळे कळसकर हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहायक उपनिरीक्षक प्रवीण अढांगळे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.