नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले…

रवा, चणाडाळ, साखर व तेल

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
गोरगरिबांसाठी राज्य शासनाने चार वस्तूंचा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केल्यानंतर पुरवठा विभागाकडे तेल आणि साखर पूर्ण आली, पण चणाडाळ आणि रवा फक्त 25 टक्केच आला आहे. त्यामुळे अर्धवट वस्तूंचे किट लाभार्थींना वाटप कसे करावे, असा प्रश्न पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारांना पडला असून, शासनाने उर्वरित वस्तू तातडीने पाठवाव्या, अशी मागणी लाभार्थींकडून केली जात आहे.

शिंदे -फडणवीस सरकारने दिवाळीप्रमाणे दसरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत साखर, तेल, चणाडाळ आणि रवा या चार वस्तूंचे किट आनंदाचा शिधा म्हणून देण्याचे जाहीर केले होते. मनमाड शहर परिसरात 15,764 तर नांदगाव शहर आणि ग्रामीण भागात 23,047 लाभार्थी आहे. काही कारणास्तव दसर्‍याला आनंदाचा शिधा मिळाला नव्हता. त्यामुळे गोरगरिबांचा हिरमोड झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी तरी आनंदाचा शिधा मिळेल, असे त्यांना वाटत असताना शासनाकडून पाठविण्यात आलेल्या चार वस्तूंपैकी केवळ तेल आणि साखर पूर्ण आली तर चणाडाळ आणि रवा फक्त 25 टक्के इतकाच आला आहे.
मनमाडसाठी तेल आणि साखर 15,764 किलो अर्थात 100 टक्के आली तर चणाडाळ 15,764 पैकी 6,600 किलो तर रवा फक्त 2,825 किलो इतकाच आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चणाडाळ, रव्याचा पत्ताच नाही; तेल, साखर आले... appeared first on पुढारी.