नाशिक : जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

लाखो लीटर पाणी वाया

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

ऐन उन्हाळ्यात सिडकोतील काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात रस्त्यालगत असलेल्या पिण्याचे पाण्याची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नागरिकांनी या प्रकारास मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. पाणी पुरवठा अधिकारी यांना संपर्क केला पंरतु त्यांनी फोन उचलला नसल्याने माजी नगरसेविका छाया देवांग व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनपाने जलवाहिनी त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात रस्त्यालगत असलेल्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. मनपा पाणी पुरवठा विभाग कार्यालय येथे तक्रार केली परंतु पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहुन वाया गेले. या बाबत तक्रार करण्यासाठी सिडको मनपा विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांना मोबाईल फोन केला तर त्यांचा फोन बंद आला. या बाबत माजी नगरसेविका छाया देवांग व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जलवहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील भागात पाणी कमी दाबाने आले. मनपाने जल वाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग यांनी केली आहे.

ऐन उन्हाळ्यात सिडकोतील काही भागात पाण्याची समस्या आहे. दुसरीकडे सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात रस्त्यालगत असलेल्या पिण्याचे पाण्याची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाणी पुरवठा अधिकारी गोकूळ पगारे फोन उचलत नाही. पाणी पुरवठा अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

– दिलीप देवांग, सामाजिक कार्यकर्त

हेही वाचा : 

The post नाशिक : जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.