नाशिक : जिल्हाभरात झालय सुरु, काय आहे ‘मिशन इंद्रधनुष्य’?

मिशन इंद्रधनुष्य, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बालकांमधील मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य सोमवारी (दि. ७) सुरू झाले आहे. ग्रामीण भागामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तीन टप्प्यांमध्ये होत असलेल्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धवट लसीकरण झालेले किंवा लसीकरण न झालेल्या बालकांची प्रतिकारशक्ती ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा कमी असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर, रुबेला निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्‍यासाठी ऑगस्टपासून तीन फेऱ्‍यांमध्ये सर्व जिल्हा, महानगरपालिकांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालक व गरोदर मातांचे आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, नर्सिंग स्टाफमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. गरोदर माता व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

असे आहेत टप्पे

मोहिमेचा पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर 2023 आणि तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोबर 2023 या तीन टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हाभरात झालय सुरु, काय आहे 'मिशन इंद्रधनुष्य'? appeared first on पुढारी.