नाशिक जिल्ह्यातील १४ न्यायाधीशांच्या बदल्या

नाशिक जिल्ह्यातील 14 न्यायाधीशांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्टार जनरल आर. एन. जोशी यांनी पारित केले आहेत. त्यामध्ये जिल्हा न्यायालयांसह वरिष्ठ दिवाणी आणि दिवाणी न्यायालयातील न्यायाधीशांचा समावेश आहे. नाशिकमधील तिन्ही स्तरातील कोर्टातून तब्बल १४ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने नवीन १६ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये नियुक्ती असलेले जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई, एस. टी. त्रिपाठी, एम. ए. शिंदे, एस. एन. भालेराव, ए. यू. कदम, विकास कुलकर्णी (नाशिक), डी. डी. कुरूल्कर, डी. वाय. गौड (मालेगाव) यांना नव्याने पदस्थापना मिळाली आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. ए. भागवत यांची पुणे येथे बदली झाली आहे. दिवाणी न्यायाधीश एस. आर. निकम (नाशिक), एस. जी. दुबाळे (नांदगाव), ए. जी. तांबोळी (सटाणा), ए. एन. सारक (नाशिकरोड), श्रीमती एस. ए. लोमटे (मनमाड) यांची अन्यत्र बदली झाली आहे.

नाशिकमध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून एन. व्ही. जीवने, पी. एम. बेदार, एल. डी. बिले, श्रीमती पी. व्ही. घुले, जे. एम. दळवी, एम. आय. लोकवाणी (नाशिक), एस. एस. कंठाळे, के. आर. पाटील (मालेगाव) यांना नव्याने नियुक्ती मिळाली आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची जबाबदारी आर. आर. खान व श्रीमती ए. जी. बेहरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश म्हणून श्रीमती आर. सी. नारवाडिया (नाशिक), श्रीमती एम. टी. खर्डे (मनमाड), यू. पी. हिंगमिरे (सटाणा), श्रीमती. एस. व्ही. लाड (नांदगाव), पी. व्ही. जोशी (मोटार अपघात), श्रीमती डी. आर. भंडारी (नाशिकरोड) यांना नव्याने पदस्थापना मिळाली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यातील १४ न्यायाधीशांच्या बदल्या appeared first on पुढारी.