नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

पोलीसांना पदक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना महासंचालक पदकाने गौरविण्यात येत असते. त्यानुसार यावर्षी राज्यातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांचा समावेश आहे. तसेच शहर व ग्रामीण पोलिस दलासह महाराष्ट्र पोलिस अकादमी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहा सहायक उपनिरीक्षकांसह चोवीस अंमलदारांना हे पदक जाहीर झाले आहे.

नाशिक आयुक्तालयातील परिमंडळ एकचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी फोर्स-वनमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तर उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांचीही कारकीर्द उल्लेखनीय ठरली. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. तसेच पोलिस आयुक्तालयातील सहायक उपनिरीक्षक शंकर गोसावी, काशीनाथ गायकवाड या दोघांनाही पदक जाहीर झाले. अंमलदार धनाजी माळोदे, माधुरी मुरकुटे, संतोष उशीर, इम्रान शेख, सोमनाथ निकम, गजानन पाटील, नीलेश भोईर, विशाल साबळे, श्रीशैल सवळी, गणेश वाघ, श्यामकांत पाटील यांनाही हे पदक जाहीर झाले आहे. यासह नाशिक ग्रामीणचे सहायक उपनिरीक्षक मुनिर सय्यद आणि अंमलदार नवनाथ सानप दोघांचीही पदकासाठी निवड करण्यात आली आहे.

दिलासा ! कोरोना कमी होतोय !

‘एसीबी’ अंमलदारांची चमकदार कामगिरी

महासंचालक पदकांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अंमलदारांनी बाजी मारली. या विभागातील आठ अंमलदारांना हे पदक जाहीर झाले आहे. त्यात प्रकाश डोंगरे, प्रभाकर गवळी, नितीन कराड, प्रवीण महाजन, अजय गरुड, शरद हेंबाडे, अमोल मानकर, चेतन मुंढे या अंमलदारांचा समावेश आहे. यासह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ, सहायक उपनिरीक्षक पिंटू भांगरे, सुनील ताकाटे, अंमलदार वैभव कुलकर्णी, कुणाल काळे यांनाही पदक प्राप्त झाले. तसेच नागरी हक्क संरक्षणचे सहायक उपनिरीक्षक अशोक जगताप, अंमलदार ज्ञानेश्वर शेलार, जयवंत सूर्यवंशी यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर appeared first on पुढारी.