नाशिक : ‘ती’ कार सीसीटीव्ही’त कैद, पोलिसांची शोधमोहीम सुरु

nashik crime

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवारी सायंकाळी चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सहा ते सात ठिकाणी मोबाइल लंपास केल्याच्या गुन्ह्यातील कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी कारमालक तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू केली आहे.

सोमवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीत काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात जणांचे मोबाइल लांबवले. यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवत कारची माहिती मिळविली. नवीन पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर व पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस उपनिरीक्षक पाडेकर यांनी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत १० ते १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या कारमालकाची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. मनोज शहा यांनी या लुटी प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अंबड पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'ती' कार सीसीटीव्ही'त कैद, पोलिसांची शोधमोहीम सुरु appeared first on पुढारी.