नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या हॉटेल, लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरित्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे.
त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. लॉज चालकांकडून नियमांचे पालन होते का नाही याची शहानिशा पोलिसांनी केली. दरम्यान याबाबत त्रंबकेश्वर पोलीसांकडे विचारणा केली असता त्यांनी नियमित कारवाई असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
- धावत्या एस.टी. बसच्या चालकाला आली चक्कर अन्…
- Stone currency : ‘या’ ठिकाणी पैसेच वापरत नाहीत लोक
- Twin sisters wish : जुळ्या बहिणींची ‘ती’ अविश्वसनीय इच्छा
The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मधील लॉजची पोलिसांकडून अचानक तपासणी appeared first on पुढारी.