नाशिक : देवळा तालुक्यात रेशन दुकानदारांच्या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील काही रास्त धान्य दुकांनांमध्ये पावती तक्रार रजिस्टर तसेच आलेले धान्य यांची माहिती बोर्डावर नसल्याच्या तक्रारीवरून लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुरुवारी (दि १३ जुलै) येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. सायंकाळी चार वाजता नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषण कर्त्यांनी देवळा तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या धान्याची पावती दिली जात नाही. तालुक्यातील काही दुकानदारांकडून बिपीएल, अंत्योदय प्राधान्य कुटूंबातील नागरिकांना धान्य दिले जाते, मात्र स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य देतांना ग्राहकांना कमी देतात, संबंधित शिधापत्रिकाधारकांचा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर धान्य कमी दिले जाते. आणि ग्राहकांना बिले ही दिली जात नाहीत. रेशन दुकानात स्पष्टपणे वाचता येईल असा माहितीचा फलक लावणे बंधनकारक असतो, माहिती फलकावर रेशन दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक तक्रार वही, रेशन कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर, एकुण कार्ड संख्या, भाव फलक, इत्यादी गोष्टी बंधनकारक असुन देखिल सुध्दा या गोष्टी दिसुन येत नाहीत. आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. १३ जुलै) जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. याची दखल घेऊन नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांनी सर्व रेशन दुकानदारांना लेखी कळवले असून, वरील प्रमाने तक्रारींचे पालन करण्यात यावे अन्यथब सबब पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा गैरबाबी निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर करण्यात येईल. अशी दुकानदारांना समज दिल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटील, नितीन अहिरे, उमेश सोनवणे, सुरेश साबळे, कैलास पवार, दीपक अहिरे, भाऊसाहेब साबळे, आप्पा केदारे, गणेश साबळे, अजय अहिरे, प्रकाश शिंदे, नितीन केदारे आदी उपोषणकर्ते उपस्थित होते.

The post नाशिक : देवळा तालुक्यात रेशन दुकानदारांच्या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण appeared first on पुढारी.