नाशिक : नराधम मोरेवर अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल

म्हसरूळ नराधम www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
येथील द किंग फाउंंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित हर्षल मोरेवर आता आडगाव पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोरेवर यापूर्वी अत्याचार प्रकरणी सात गुन्हे दाखल आहेत.

संशयित हर्षल मोरेने मागील वर्षी द्रोण तयार करण्याचे मशीन घेतले होते. वसतिगृहातील मुलांकडून तो द्रोण विक्री करवून घेत असल्याचेही समोर आल्याने आडगाव पोलिसांनी बालसुरक्षा कायद्यांतर्गत आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अ‍ॅट्रॉसिटीचा असे दोन गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या आता नऊ झाली आहे. तसेच, द्रोण तयार करताना एका मुलाला जखम झाल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, संशयित हर्षल मोरेने द्रोण तयार करण्याचे मशीन जत्रा हॉटेल, वृंदावननगर येथील प्रगती सोसायटीतील ज्या घरात ठेवले होते, ते घर धर्मादाय आयुक्तांनी यापूर्वीच सील केलेले असल्याने ही मशीनरी पोलिसांना तूर्त ताब्यात घेता आलेली नाही. मात्र, पंचनाम्यासाठी घराचे सील काढून मिळावे, अशी विनंती पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांना केली असून, लवकरच त्याबाबत कार्यवाही होणार असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : नराधम मोरेवर अ‍ॅट्रॉसिटीसह वेठबिगारीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.