नाशिक : नांदगावमध्ये अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भरती

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगांव तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नांदगाव या कार्यालयाचे अंतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

पात्र उमेदवारांनी पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, प्रभारी बाल विकास प्रकल्प प्राची पवार यांनी केले आहे. विविध पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता उमेदवार इ. १२ वी उत्तीर्ण असून. वयोमर्यादा १८ वर्ष ते ३५ वर्ष आणि विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष इतकी राहणार आहे. उमेदवार हा त्याच महसुली गावचा रहिवासी असणे गरजेचे आहे. इच्छुक तसेच पात्र गरजू महिला उमेदवारांनी दि. ३० जुन ते दि. १३ जुलै २०२३ या दरम्यान संबंधित कार्यालयीन दिवशी अर्ज सादर करावा लागणार आहे.

मिनी अंगणवाडी सेविका भरती साकोरा (अस्वलदरा महसुल गांव ) पवारवस्ती अस्वलदरा या ठिकाणी होणार आहे…

अंगणवाडी मदतनीस भरती गावे ग्रा. पं क्रांतीनगर -पाटखाना / मोकळवाडा/ भोसलेवाडा , ग्रा.पं.हिंगणवाडी हिंगणवाडी , प्रा. पं. वाखारी इंदिरानगर ,ग्रा.पं. बोयेगांव, ग्रा.पं.द-हेल -द-हेल ,ग्रा.पं. वडाळी खु ,ग्रा.पं. माळेगांव क-हयात ,कोळी वस्ती ,ग्रा.पं. माळेगांव कर्हात नारायणगांव,ग्रा.पं. भालुर,ग्रा.पं. मोहेगांव,हारदेवस्ती, ग्रा.पं. क-ही, अनकवाडे लाभांनतांडा, ग्रा. पं. सटाणे, ग्रा.पं. पानेवाडी, ग्रा.पं. पिंपरखेड – पिंपरखेड एक / पिंपरखेड दोन, बाणगांव खुर्द ग्रा.पं. चिचंविहीर, चिचविहीर – तांडा, ग्रा.पं. बाभुळवाडी बाभुळवाडी/ ग्रा.पं. बाभुळवाडी डॉक्टरवाडी (डॉक्टरवाडी महसुलगांव), ग्रा.पं. खिर्डी, तांदुळवाडी, ग्रा.पं.नायडोंगरी अन्दुबाईतांडा, संपतनगर,नायडोंगरी एक , तारुतांडा, प्रा. पं. पिंप्री हवेली पिंप्री हवेली दोन, ग्रा.पं. रणखेडा , ग्रा.पं.बिरोळे ,ग्रा.पं. धोटाणे खु , ग्रा.पं. पाझणदेव – डगळेवस्ती, ग्रा.पं. नांदुर, केसकरवस्ती, ग्रा.पं. नवसारी, ग्रा.पं. हिसवळ बु, ग्रा.पं. खादगांव, ग्रा.पं. अस्तगांव – टेकाडेवस्ती, ग्रा.पं. बोलठाण बोलठाण एक / बोलठाण दोन /बोलठाण तीन / आंबेडकरनगर, ग्रा.पं. जळगांव बु ग्रा.पं. माणिकपुंज, ग्रा.पं. जातेगांव, जातेगांव दोन/ ग्रा.पं.जातेगांव-वंसतनगर , ग्रा. पं. लोंढरे ठाकरवाडी / लोंढरे , ग्रा.पं. कसाबखेडा कसाबखेडा, ग्रा.पं.कळमधरी एक / कळमधरी दोन, ग्रा.पं.वेहेळगांव – वेहेळगांव तीन, ग्रा.पं. मुळडोंगरी – मुळडोंगरी, ग्रा.पं.मंगळणे, ग्रा.पं.न्यू पांझण, ग्रा. पं पळाशी ,ग्रा.पं. तळवाडे, ग्रा.पं. साकोरा साकोरा दोन,ग्रा.पं. सावरगांव- सावरगांव दोन इत्यादि गाव आणि अंगणवाडी केंद्रावरील रिक्त जागांवरती भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगावमध्ये अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भरती appeared first on पुढारी.