नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

अत्याचार

नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून एकाने युवतीवर अत्याचार करून तिला मारहाण करीत दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पीडितेने गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित सागर मधुकर कदम (29, रा. कॉलेजरोड) याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडिता ही कॉलेजरोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये कामास असून, तेथील सागर कदमने पीडितेस पदोन्नती देण्याचे आमिष दाखविले. त्याचप्रमाणे दि. 12 ते 22 ऑक्टोबरदरम्यान त्याने पंचवटीतील एका गेस्ट हाउसवर नेत तिच्यावर अत्याचार केले. त्याचप्रमाणे हा प्रकार कोणाला सांगू नको, असे धमकावत तिला मारहाण केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार appeared first on पुढारी.