नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा

नाशिक पदवीधर मतदारसंघ www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक मतदारसंघाच्या रणकंदनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत असून या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मविआने पाठिंबा दिला आहे. तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा देणार असे म्हटलं जात असतानाच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. याबाबत रविवारी (दि.२९) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. “आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन त्यांच्यासारख्या तरुणाईला संधी देणे महत्वाचे आहे. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातच नाशिक पदवीधर निवडणूकीत थेट लढत होणार असून या जागेवर कोण बाजी हे उद्या होणा-या मतदानाच्या पारड्यावरुन समजेलच.

हेही वाचा:

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा appeared first on पुढारी.