नाशिक : ‘पन्नास खोके एकदम ओके’ सत्तांतर नाट्याचे पोळा सणावरही पडले पडसाद

50 खोके एकदम ओके,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात घडणार्‍या नाट्यमय घडामोडींसह विविध बाबींकडे बैल पोळ्याच्या निमित्ताने लक्ष वेधले. ठाणगाव येथील शेतकरी किरण बोर्‍हाडे यांनी त्यांच्या सर्जा राजावर विधानभवनात गाजलेला ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हा डायलॉग रेखाटल्याने संपूर्ण गावात चर्चेचा ठरला.

प्रत्येक सण, उत्सवात राजकीय प्रतिबिंब उमटत असते, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असो वा दहीहंडी.राजकीय पक्षांसाठी हे उत्सव संजीवनी देण्याचे काम करतात. पोळा सणदेखील त्याला अपवाद नाही, पोळ्याला बैलांची सजावट करताना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षांची जाहिरात करण्याची संधी सोडत नाही आणि विरोधकांवर निशाणाही साधतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याचे पडसाददेखील पोळ्यावर उमटलेले दिसून आले.

ठाणगाव येथील शेतकरी किरण बोर्‍हाडे यांनी त्यांच्या सर्जा-राजावरही विधानभवनात गाजलेला ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हा डायलॉगच संपूर्ण गावात चर्चेचा ठरला. याशिवाय सांगोल्याचे आमदार शहाजी बापू यांचा गुवाहाटीतील काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओके असे डायलॉग लक्ष वेधून घेत होते. यातून शेतकरी बांधवांमध्येही नवीन सरकारबद्दल नाराजी असल्याचे दिसून आले.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘पन्नास खोके एकदम ओके’ सत्तांतर नाट्याचे पोळा सणावरही पडले पडसाद appeared first on पुढारी.