नाशिक-पुणे मार्गावर धावणार जनशिवनेरी

जनशिवनेरी, ई शिवनेरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वर्षभर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नाशिक-पुणे मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते. त्यातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. लालपरी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी आदी नावांच्या प्रवासी वाहतूक सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद असतो. मात्र, खासगी शिवशाही बंद केल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक-पुणे मार्गावर ई-शिवनेरी उतरविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या व्होल्व्हो बसेस जनशिवनेरी नावाने धावणार आहेत.

साधी, निमसाधी, शिवनेरी, शिवशाही, स्लीपर कम सीटर यासारख्या डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसपाठोपाठ आता इलेक्ट्रिक बस असलेली ई-शिवनेरी या नावाची आधुनिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ई-शिवनेरी ही महामंडळाच्या ताफ्यातील प्रिमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्व्हो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक जण त्याला प्राधान्य देतात. आता हीच बस जनशिवनेरी नावाने नाशिक-पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

जनशिवनेरीत संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध आहेत. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असून, बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. त्यामुळे नाशिक-पुणे मार्गावरील प्रवास आरामदायी होणार आहे. या मार्गावर दहा जनशिवनेरी धावणार असून, प्रत्येक तासाला ही बस सुटणार आहे. या बसला एका प्रवाशासाठी ५०० रुपये तर अर्धे २५५ रुपये एवढे तिकीट असणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक-पुणे मार्गावर धावणार जनशिवनेरी appeared first on पुढारी.