नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पार पडली. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली.
माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी मनपा गटनेते विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे यांच्यासह इच्छुक उमेदवार भारती ताजनपुरे, सविता तुंगार, जगन आगळे, प्रकाश म्हस्के, भास्कर गावित, उत्तम खांडबहाले, उत्तम आहेर, नवनाथ गायधनी, गोकुळ काकड, संजय तुंगार, सुरेश निमसे, दिनकर पाळदे, भरत आहेर, अशोक (बालम) बोराडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक स्वबळावर लढवून ती जिंकण्याची आमची सक्षम यंत्रणा तयार आहे. निवडणूक स्वतंत्रपणे लढवाव्यात असे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे असून त्यांचा आम्ही आदर करतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य मित्र पक्षही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांच्याशी युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील. माघारीच्या अंतिम तारखेच्या आधी याबाबतचा फैसला निश्चितच होईल, असे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख प्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. आम्ही सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याचे उपनेते सुनील बागूल म्हणाले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते यांनीही मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा:
- Optical Illustion Test : ‘या’ आंब्यांमध्ये एक पोपट लपला आहे; शोधा बरं सापडतोय का तुम्हाला…
- Ajinkya Rahane : धोनीच्या ‘या’ गुरुमंत्राने अजिंक्य रहाणेचे नशीब चमकले!
- राष्ट्रपती मुर्मू यांनी जाणून घेतली सिंधूताई यांच्या कार्याची माहिती
The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.