नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 169 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल होते. तथापि, माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गुरुवारी (दि.20) 124 जणांनी माघार घेतल्याने आता 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलची, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जनसेवा परिवर्तन तर भाजप-मनसे व मित्र पक्षांच्या आघाडीने श्री बळीराजा विकास पॅनलची निर्मिती करून उमदेवार जाहीर केले आहेत. शरद गुरुळे ग्रामपंचायत गट अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत.

आमदार कोकाटे यांनी जुन्या संचालकांपैकी केवळ माजी सभापती विनायक घुमरे व संजय खैरनार यांच्या उमेदवारी रिपिट केल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-मनसे व मित्र पक्षांच्या आघाडीने तिसर्‍या पॅनलच्या निर्मितीचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना 18 पैकी केवळ 8 जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.

आमदार कोकाटे प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे मेदवार
सोसायटी गट : सर्वसाधारण- शशिकांत गाडे, भाऊसाहेब खाडे, अनिल शेळके, रवींद्र शिंदे, विनायक घुमरे, आबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर हारळे. महिला राखीव गट- सिंधुबाई कोकाटे, सुरेखा पांगारकर. इतर मागासवर्गीय – संजय खैरनार. भ.ज.वि.ज. – रामदास जायभावे. ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण- पंढरीनाथ ढोकणे, भाऊसाहेब नराडे. आर्थिक दुर्बल घटक – जगदीश कुर्‍हे, अनु. जाती/जमाती – दीपक जगताप. व्यापारी गट : जगन्नाथ खैरनार, विजय तेलंग. हमाल-मापारी गट : नवनाथ नेहे.

माजी आ. वाजे प्रणित जनसेवा परिवर्तन पॅनल
सहकारी संस्थांचा मतदारसंघ : सर्वसाधारण गट – शरदराव थोरात (पंचाळे), सोमनाथ जाधव (कोमलवाडी), शरद गिते (मेंढी), जालिंदर थोरात (पाथरे), योगेश माळी (मनेगाव), शिवनाथ दराडे (दापूर), रघुनाथ आव्हाड (दोडी बुद्रुक). महिला राखीव गट- सुनीता कदम (कोळगावमाळ), ताराबाई कोकाटे (खडांगळी). इतर मागासवर्गीय गट-शिवाजी खैरनार (चास), विमुक्त जाती/भटक्या जमाती गट – नवनाथ घुगे (पास्ते), ग्रामपंचायतीचा मतदारसंघ : सर्वसाधारण गट – डॉ. रवींद्र पवार (सोनांबे), श्रीकृष्ण घुमरे (पांगरी), अनु. जाती/जमाती गट – गणेश घोलप (खोपडी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक- प्रकाश तुपे (बेलू). व्यापारी मतदारसंघ- सुनील चकोर (पाटोळे), रवींद्र शेळके (नांदूरशिंगोटे). हमाल व तोलारी यांचा मतदारसंघ- किरण गोसावी (नांदूरशिंगोटे).

भाजप-मनसे आघाडी श्री बळीराजा विकास पॅनल
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून – अ‍ॅड. दिलीप केदार (दातली), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून- राजेंद्र कटारनवरे (निर्‍हाळे), सहकारी संस्था सर्वसाधारण – ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, अनिल शिंदे (ठाणगाव), सहकारी संस्था महिला राखील गटातून – यमुनाबाई आव्हाड (पास्ते), इतर मागासवर्ग प्रवर्गातून -बहिरू दळवी (विंचुरीदळवी), वि.ज./भ.ज. गटातून – मीराबाई सानप (चास), व्यापारी गटातून- नंदकुमार जाधव (सिन्नर).

हेही वाचा:

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती appeared first on पुढारी.