नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने

कृषी उत्पन्न बाजार समिती www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 159 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी गुरुवारी (दि. 20) 115 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 18 जागांसाठी 44 उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकले आहेत.

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे माघारीच्या दिवशी पॅनलचे उमेदवार घोषित करण्यात आले. माजी आमदार शिवराम झोले, अ‍ॅड. संदीप गुळवे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव व माजी जि. प. सदस्य गोरख बोडके पॅनलचे नेतृत्व करणार आहे. निवडणुकीत इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष व शिंदे गट आदींची युती झाली असून संपूर्ण 18 जागा पॅनल लढणार आहे. यावेळी काँग्रेस नेते अ‍ॅड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विकी संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, भाऊसाहेब खातळे, शिवाजी शिरसाठ, शिवसेना शिंदे गटाचे नेते देविदास जाधव, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख भगवान आडोळे आदींसह उमेदवार आणि समर्थक उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, रतनकुमार इचम, पांडुरंग बर्‍हे, भास्कर गुंजाळ, अ‍ॅड. एन. पी. चव्हाण यांनी शेतकरी परिवर्तन पॅनलची घोषणा केली. बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनलचच्या माध्यमातून सत्ता काबीज करू, असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून परिवर्तन घडवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

शेतकरी परिवर्तन पॅनल
सर्वसाधारण सोसायटी गटातून रमेश पाटेकर, उत्तम भोसले, उदय जाधव, रघुनाथ तोकडे, संदीप धांडे, भाऊराव जाधव, दिलीप पोटकुले, तर महिला राखीव मधून अनिता घारे, शोभा पोरजे. इतर मागास प्रवर्गातून संपत काळे. भटक्या विमुक्त जमाती मधून छाया चव्हाण. ग्रामपंचायत मतदार संघातून दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर मोंढे. आर्थिक दुर्बल गटातून मालन वाकचौरे. अनुसूचित जमातीमध्ये मारुती आघाण तर व्यापारी मतदार संघातून मोहन चोरडिया, ज्ञानेश्वर भगत तर हमाल मापारी मतदार संघातून मनोहर किर्वे हे उमेदवार आहेत.

शेतकरी विकास पॅनल
सहकारी संस्था सर्वसाधारण गट : निवृत्ती जाधव, सुनील जाधव, शिवाजी शिरसाठ, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश जाधव, भाऊसाहेब कडभाने तर महिला राखीवमधून सुनीता गुंळवे, आशा खातले तर इतर मागास वर्गातून राजाराम धोंगडे तर ग्रामपंचायत मतदार संघातून अर्जुन भोर, नंदलाल भागडे तसेच ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्र वर्गातून संतू साबळे तर आर्थिक दुर्बल गटातून संपत वाजे, व्यापारी मतदार संघातून भरत आरोटे, नंदलाल पिचा व हमाल तोलारी गटातून रमेश जाधव हे उमेदवार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : बाजार समिती, शेवटच्या दिवशी 115 जणांची माघार; दोन पॅनल आमने-सामने appeared first on पुढारी.