नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या रुग्णालयांमधील कमी मनुष्यबळ पाहता आता मनपा प्रशासन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे सरळ सेवेने कायमस्वरूपी भरेपर्यंत सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्ती करणार असून, त्यास आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्यता दिली आहे.

महापालिकेचे शहरात नवीन बिटको, झाकिर हुसेन तसेच जिजामाता, इंदिरा गांधी अशी मोठी रुग्णालये आणि विविध ठिकाणी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे कार्यरत आहेत. त्यासाठी मनपाच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे १९५ पैकी १५२ पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत एकूण ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सुविधा पुरविल्या आहेत. शहराचा वाढता विस्तार तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागांतूनही नाशिक मनपाच्या रुग्णालयांत रुग्ण उपचारांसाठी येत असल्याने मनुष्यबळावर मोठा ताण निर्माण होत असतो. ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच सध्या रुग्णांचे उपचार अवलंबून असून, अनेकदा डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने बाके प्रसंग निर्माण होत असतात. महापालिका रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाकरता मंजूर पदांची सरळसेवेने भरती होईपर्यंत तज्ज्ञ वैद्यकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने महासभेत सादर केला होता. त्यास महासभेने मंजुरी दिली आहे.

अशी आहेत तातडीने भरावयाची पदे

वैद्यकशास्त्र तज्ज्ञ- ४, शल्यचिकित्सक- २, स्त्रीरोगतज्ज्ञ- ६, बालरोगतज्ज्ञ- ४, रेडिओलॉजिस्ट- ४, भूलतज्ज्ञ – ४, अस्थिव्यंग तज्ज्ञ – ४, कान नाक व घसा तज्ज्ञ – २, पॅथॉलॉजिस्ट- २, मानसोपचारतज्ज्ञ – २, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)-

हेही वाचा :

The post नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार appeared first on पुढारी.