नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार

ना. डॉ. भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महानगरी व गोरखपूर व कामायनी एक्स्प्रेस यांचा रविवार (दि.१४) पासून नांदगाव व लासलगाव येथील थांबा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. कोरोनाच्या अडीच वर्षांच्या काळानंतर या गाड्यांचा थांबा पूर्ववत होणार असल्याने नांदगावकरांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केले होते. या मध्ये महानगरी, गोरखपूर व कामायनी एक्स्प्रेस या गाड्यांचा नांदगाव व लासलगाव येथील थांबा रद्द करण्यात आला होता. हा थांबा पूर्ववत सुरू करावा यासाठी डाॅ. पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानूसार येत्या रविवारपासून या रेल्वेगाड्या त्यांच्या पूर्ववत थांब्यानुसार नांदगाव व लासलगावला थांबणार आहे. रेल्वे मंत्रालयाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर एक्स्प्रेस; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाराणसी महानगरी एक्स्प्रेस तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस‌ ते वाराणसी कामायनी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे नांदगाव व लासलगाव येथील थांबे रद्द केल्याने नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. ना. वैष्णव व ना. दानवे यांनी या दोन्ही स्थानकांवरील रेल्वेथांब्याला परवानगी दिल्याबद्दल डाॅ. पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ना. दानवे दाखविणार झेंडा : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे रविवारी (दि.१४) सकाळी ११ वाजता रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहे. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. या तिन्ही रेल्वेचे नांदगाव व लासलगाव येथील थांबे मंजूर झाल्याने निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड यासोबत उत्तर महाराष्ट्रातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार appeared first on पुढारी.