नाशिक : येवला बाजार समितीवर छगन भुजबळांची सत्ता

APMC Market Election

येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला 18 पैकी 13 जागा तर विरोधी शेतकरी समर्थक पॅनलला तीन जागा मिळाल्या. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली. (APMC Market Election)

मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाले. पहिल्या तासातच हमाल तोलारी गटामध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन ढमाले यांनी भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे गोरख सुरासे यांचा पराभव केला. त्यानंतर व्यापारी गटामधून भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे नंदकिशोर अट्टल तर अपक्ष उमेदवार भरत समदडिया विजयी झाले. (APMC Market Election)

ग्रामपंचायत गटामधून शिंदे दराडे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलचे महेश काळे व भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे व शिवसेना नेते संभाजी पवार यांचे निकटवर्तीय बापू गायकवाड हे विजयी झाले. (APMC Market Election)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटांमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सचिन आहेर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत शेतकरी समर्थक पॅनलच्या झुंजारराव देशमुख यांचा पराभव केला, तर अनुसूचित जाती गटामध्ये भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे व शेतकरी संघटनेच्या संध्या पगारे यांनी विजय मिळवीत शेतकरी समर्थक पॅनलचे गुड्डू जावळे यांचा पराभव केला.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मधून भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे अन शिवसेना नेते संभाजी पवार यांचे समर्थक कांतीलाल साळवे विजयी झाले आहे.

महिला राखीव गटामधून शिंदे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलच्या उषाताई शिंदे व शेतकरी विकास पॅनलच्या लता गायकवाड ह्या विजयी झाले.

ओबीसी जागेसाठी झालेल्या लढतीमध्ये भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे वसंतराव पवार यांनी विजय मिळवत शेतकरी समर्थक पॅनलच्या आणि प्रहार संघटनेच्या हरिभाऊ महाजन यांचा पराभव केला.

सोसायटी गटातील सात जागेंसाठी भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहा तर शेतकरी समर्थक पॅनलचं एक उमेदवार विजयी झाले. या गटामध्ये शेतकरी विकास पॅनलचे मोहन शेलार यांचा अवघ्या एकमताने पराभव झाला. मोजणीच्या घोळात पुन्हा फेर मत मोजणी मोहन शेलार यांच्या अर्जाने झाल्याने सोसायटी गटाचा अंतिम निकाल संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान जाहीर करण्यात आला.

शेतकरी विकास पॅनलचे अल्केश कासलीवाल, किसनराव धनगे, सविता पवार, संजय बनकर, रतन बोरणारे, संजय पगार तर शेतकरी समर्थक पॅनलचे भास्कर कोंढरे हे विजयी झाले.

अधिक वाचा :

The post नाशिक : येवला बाजार समितीवर छगन भुजबळांची सत्ता appeared first on पुढारी.