नाशिक : रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून रथ मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

श्रीराम रथयात्रेनंतर गोदा घाट, रामकुंड संपूर्ण रथयात्रा मार्गावर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे रथोत्सव मिरवणूक मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

रथोत्सव मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर या मार्गावरील सगळा कचरा संकलीत करुन तात्काळ घंटागाडी मार्फत उचलून घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत श्री काळाराम मंदिर, नागचौक, कात्यामारुती चौक, गणेशवाडी मार्गे, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, रामकुंड आदी परिसरातील श्रीराम रथ मिरवणूक मार्गावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली.

यावेळी पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उदय वसावे, दीपक चव्हाण, स्वच्छता निरीक्षक किरण मारू, मुकादम बाळु पवार, चंद्रशेखर साबळे, दिनेश सोलंकी, नरेश नागपुरे, निलेश गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे, संजय जमधाडे आणि ७० स्वच्छता कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे, अजिंक्य राईकर यांच्यासह एकूण ६५ कर्मचारी असे एकूण १३५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. पंचवटीत सर्वत्र स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

The post नाशिक : रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून रथ मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.