नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार

अपघात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा नाशिक राज्यमार्गावर हॉटेल महाराष्ट्र व हॉटेल दुर्गा परीसरात मंगळवारी (दि १८) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये एक शेतमजूर जागीच ठार झाला आहे. या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा -नाशिक राज्यमार्गावर येथील हॉटेल महाराष्ट्र व हॉटेल दुर्गा परीसरात मंगळवारी (दि. १८) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास छोटा हत्ती वाहन (एमएच-41/एयू-3984 ) हे वाहन नाशिककडून देवळा दिशेने भरधाव येत असताना देवळा बाजूकडून नाशिकच्या दिशेने जाणारी मोटारसायकला समोरुन जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार पिंटू सोन्या धुळे (३६) हा शेतमजूर गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. दरम्यान,देवळा-नाशिक हा राज्यमार्ग भावड बारी घाटापर्यंत अत्यंत खराब आला असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडली आहेत. खराब रस्त्याअभावी याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून, आतापर्यंत तेरा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : रामेश्वर फाट्यानजीक अपघातात शेतमजूर ठार appeared first on पुढारी.