नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित

सुनिता धनगर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर ५५ हजारांच्या लाच घेतल्या प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड आढळून आले. दरम्यान, शासनाने धनगर यांना निलंबित करण्याचे आदेश काढल्याने, महापालिकेच्या शिक्षण विभागात समाधान व्यक्त केले जात आहे. धनगर यांच्या कारनाम्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

आपल्या मुजोर आणि हेकेखोर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीता धनगर यांच्या चौकशीदरम्यान सापडलेल्या मालमत्तेचे आकडे बघून एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले होते. दीड कोटींच्या घरातील झडतीत तब्बल ८५ लाखांची रोकड आणि ३२ तोळे सोने जप्त करण्यात आले. तपासाच्या दुसऱ्या दिवशी 30 लाखांची रक्कम बँक खात्यात आढळली. धनगर यांची बेकायदेशीर मालमत्ता लक्षात घेता गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर यांचा लाचखोरीचा कारनामा सुरू असल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगत आहे.

धनगर यांचे निलंबन केल्याने त्यांचा प्रभारी पदभार पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मिता चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, धनगर यांच्यावर लाचखोरीच्या अनेक प्रकरणांविषयी संशय व्यक्त केला जात होता. शिवाय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना उणेदुणे बोलून त्यांची लायकी काढायच्या. अनेकांसोबत असे प्रसंग घडल्याने त्यांच्याविषयी प्रचंड नाराजीचा सूर होता. दरम्यान, शासनाने काढलेल्या निलंबनाच्या आदेशात धनगर यांना चांगलेच फटकारले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लाचखोर सुनीता धनगर अखेर निलंबित appeared first on पुढारी.