नाशिक : लासलगावी महावीर जयंती निमित्त शोभायात्रा

महावीर जयंती,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) पुढारी वृत्तसेवा
लासलगाव शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील सकल जैन समाजातर्फे शहरात महावीर जयंती  निमित्त भव्य शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी ९३ नंबर येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित अश्वरथात तेजस भंडारी या लहानग्याने भगवान महावीर यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी श्री महावीर विद्यालयाचे सवाद्य, लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली.

अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. जैन बांधव, आबालवृध्दांसह महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.  महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाजातर्फे भक्ती संध्या, भव्य रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. श्री महावीर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रवीण डुंगरवाल, उपाध्यक्ष मनोज शिंगी आणि कार्याध्यक्ष सुनील आबड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

या प.पु. राजेशजी म सा यांचे व्याख्यान तसेच जैन समाजातील पदवीधर युवक व युवतींचा सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार श्री महावीर जयंती उत्सव समितीच्या सदस्य पदी पंकज आबड, ऋषभ भंडारी, सुनील चंडालिया, अशोक दगडे, मनोज ब्रम्हेचा, महेंद्र कासलीवाल, संदीप शिंगवी, विरेंद्र साबद्रा, संकेत चोरडिया, ऋषभ राका यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, सरपंच जयदत्त होळकर, सुवर्णा जगताप, वेदिका होळकर, प्रकाश दायमा, संजय पाटील, पंढरीनाथ थोरे, गुणवंत होळकर, शिवा सुरासे, पुरुषोत्तम चोथानी, अशोक होळकर, प्रकाश पाटील, प्रतीक चोथानी, बाळासाहेब दराडे, सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ,सर्व पत्रकार बांधव आणि सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हेही वाचा : 

The post नाशिक : लासलगावी महावीर जयंती निमित्त शोभायात्रा appeared first on पुढारी.