नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की

महावितरण कर्मचारी यास धक्काबुक्की,www.pudhari.news

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

उंबरठा वनपरिक्षेत्रातील बोरीपाडा वनक्षेत्राचे कर्मचारी नवनाथ बंगाळ यांना सोमवारी (दि.5) अकराच्या सुमारास चापावाडी या भागात वृक्षाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार बंगाळ हे जंगलाची तपासणी करण्यासाठी गेले असताना काही संशयित या भागातील सादड्याचे झाड इलेक्ट्रॉनिक करवतीने कापत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत सखोल चौकशी केली असता सदर झाड मालकीचे आहे असे संशयितांनी वनरक्षकास सांगितले. वनरक्षकाने करवत ताब्यात घेत उंबरठाण येथे वनपरिक्षेत्रात कार्यालयात या असे सांगितल्याचा राग आल्याने संशयितांना थेट करवत घेत पाठलाग करत हातातील करवत हिसकावून वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यास धक्का बुक्की करण्यात आली. याबाबत कांतीलाल पांडू चौधरी, योगेश कांतीलाल चौधरी, नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या भागातील सागवानाचे लाकूड संशयित चोरट्यांनी पूर्णतः तस्करी करीत संपवले आहे. तर खुंटविहीर, रानविहीर, पिंपळसोंड, तातापानी, उंबरपाडा(पि), चिंचमाळ, बर्डा या भागातील खैराच्या झाडाकडे खैर तस्करांनी मोर्चा वळवला आहे.

The post नाशिक : वन कर्मचारी कर्तव्यावर असतांना संशयितांकडून धक्का बुक्की appeared first on पुढारी.