नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन

सीबीएस ते वाडीव-हे बस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सीबीएस ते वाडीवर्‍हे, जातेगाव, इगतपुरी या मार्गांवर जाणार्‍या बसेसच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्याने, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. केवळ महामंडळाच्या चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वेळापत्रक पूर्ववत करण्याबरोबरच बसफेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या विल्होळी शाखेकडून करण्यात आली आहे.

याबाबत विभाग नियंत्रकांना निवेदनही देण्यात आले आहे. विल्होळी ते इगतपुरी या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने नाशिकमध्ये शिक्षणानिमित्त ये-जा करतात. अनेकांनी पासेसही काढलेले आहेत. मात्र, महामंडळाने अचानकच बसेसच्या वेळापत्रकात बदल केल्याने, विद्यार्थ्यांना खासगी वाहने गाठावी लागत आहेत. सिटी लिंक बसेसच्या फेर्‍यांमुळे हा बदल केला असला तरी याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. दुपारी 12 वाजता येणारी महामंडळाची बस दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयाची वेळ साधणे अवघड होत आहे. अशात वेळापत्रक पूर्ववत करण्याबरोबरच अतिरिक्त बसफेर्‍या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी स्वराज्यकडून करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्यचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर, शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, तुषार डांगे, संतोष थोरात, ईश्वर सहाणे, किशोर चव्हाण, यश, भावना, संकेत थोरात यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : विद्यार्थ्यांसाठी बसफेर्‍या वाढवा;  ‘स्वराज्य’चे निवेदन appeared first on पुढारी.