नाशिक विभागातील नऊ उपजिल्हाधिकारी, 35 तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शासनाने नाशिक विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या तसेच ३५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि.२) काढले आहेत. बदल्यांमध्ये पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई व जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन अधिकारी सीमा अहिरे व उपजिल्हाधिकारी (रोहयो) हिरामण झिरवाळ यांचा समावेश आहे. दरम्यान, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांचीही शासनाने बदली केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये बदल्या केल्या जात आहेत. त्यामध्ये एकाच पदावर तीन वर्षे व त्याहून अधिक कार्यकाळ व्यतित केलेले तसेच स्व-जिल्ह्यात नियुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार शासनाने शुक्रवारी (दि. २) महसूल विभागातील ९ उपजिल्हाधिकारी तसेच ३५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढलेत.

मधुमती सरदेसाई यांची धुळे येथे भुसंपादन क्रमांक १ या रिक्त जागेवर नियुक्त झाली आहे. तर सीमा अहिरे यांची वर्धा येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक झाली आहे. त्यांच्या जागेवर नगर येथील भुसंपादन अधिकारी क्रमांक-१ पल्लवी निर्मळ यांची नियुक्ती झाली. याशिवाय हिरामण झिरवाळ यांना तुर्तास कोणताच पदभार दिलेला नाही. तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या कैलास कडलग यांच्याकडे चांदवड प्रांतधिकारी पदाची जबाबदारी आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्या नविन जागी नियुक्त व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

बदली झालेले अधिकारी 

नाव सध्याचे पद नवीन नियुक्ती
सीमा अहिरे भुसंपादन अधिकारी, नाशिक निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा
सुरेखा चव्हाण उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन), धुळे उपजिल्हाधिकारी (रोहयो), नाशिक
संदीप पाटील भुसंपादन अधिकारी, धुळे उपजिल्हाधिकारी (प्रशासन), धुळे
संजय बागडे सचिव (गानिप्र), नंदुरबार उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन), धुळे
पल्लवी निर्मळ भुसंपादन अधिकारी-१, नगर भुसंपादन अधिकारी क्रमांक-२, नाशिक
जयश्री आव्हाड भुसंपादन अधिकारी-१४, नगर उपजिल्हाधिकारी (महसुल), पुणे
कैलास कडलग  प्रांतधिकारी, चांदवड (नियुक्तीच्या प्रतिक्षेत)
मधुमती सरदेसाई उपसंचालक, पर्यटन संचनालय भुसंपादन अधिकारी क्रमांक-१, धुळे

तहसीलदार बदल्या (कंसात बदलीचे नवे ठिकाण)

निवडणूक तहसीलदार मंजुषा घाडगे-पाटील (सर्वसाधारण शाखा, नाशिक), दिंडोरी पंकज पवार (संगायो, धुळे), नाशिक संगायो योगेश शिंदे (भुसाधार, नगर), निफाड शरद घोरपडे (सर्वसाधारण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर), पेठ अनिल पुरे (संगायो, जळगाव), नांदगाव सिद्धार्थ मोरे (अकोले), देवळा विजय सुर्यवंशी (चिटणीस, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), संगायो धूळे आशा गांगूर्डे (पेठ), अपर चिटणीस जळगाव उषाराणी देवगुणे (संगायो, नाशिक शहर), भडगाव मुकेश हिवाळे (संगायो, मालेगाव), अक्कलकुवा रामजी राठोड (सुरगाणा), नगर (महसुल) माधुरी आंधळे (संगायो, नाशिक जिल्हा) भुसूधार, नगर सुनिता जऱ्हाड (करमणूक कर शाखा, नाशिक), संगायाे नगर विशाल नाईकवाडे (निफाड), अर्चना भाकड (महसुल, नाशिक), पाथर्डी शाम वाडकर (निवडणूक शाखा, नाशिक), संगायो मालेगाव क्षितिजा वाघमारे (श्रीगोंदा), मुकेश कांबळे (दिंडोरी), नाशिकच्या जिल्हा संगोयो तहसीलदार रचना पवार तसेच सुरगाणा तहसीलदार प्रशांत कुलकर्णी हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत.

हेही वाचा :

The post नाशिक विभागातील नऊ उपजिल्हाधिकारी, 35 तहसीलदारांच्या बदल्या appeared first on पुढारी.