नाशिक : व्हेजीटेबल कंपनीला ८८ लाखांना गंडा

Fraud

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

द्राक्ष खरेदीचे कमीशन देण्याचे अमिष दाखवुन 88 लाख 58 हजार 854 रुपयांची द्राक्षे खरेदी करुन त्याची रक्कम न देता व्हेजीटेबल कंपनीला चुना लावणाऱ्या दिल्लीच्या दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरीफाटा मार्केट येथे विकास हिरामन घुगे यांची वक्रतुंड व्हेजीटेबल कंपनी आहे. माळेदुमाला येथे वास्तव्यास असलेल्या घुगे यांचा परीचय तेजपाल सिंह कुशवाह (पश्चिम दिल्ली) व आशिष मिश्रा (मंडी दिल्ली) यांच्याशी झाला. या दोघांनी घुगे यांचा विश्वास संपादन केला. शेतकऱ्यांकडुन द्राक्ष खरेदी करा व ते द्राक्ष आम्ही खरेदी करु व त्यापोटी कमिशन देऊ, असे अमिष दाखविले. माळेदुमाला शिवार व परीसरातुन 4894 क्विंटल द्राक्षे शेतकऱ्यांकडुन खरेदी केली व ही द्राक्षे घुगे यांनी दिल्लीतील दोघा व्यापाऱ्यांना विकली. या दोघा व्यापाऱ्यांनी 88 लाख 58 हजार रुपयांची द्राक्षे खरेदी केली व रक्कम न देता पोबारा केला. घुगे यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क करुनही फायदा झाला नाही. शेतकरी घुगेंकडे रकमेसाठी तगादा करु लागले. अखेर घुगे यांनी वणी पोलिसांकडे धाव घेत दिल्लीच्या दोघा ठगांविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:

The post नाशिक : व्हेजीटेबल कंपनीला ८८ लाखांना गंडा appeared first on पुढारी.